मोर्चातील पदाधिकाऱ्यांकडून पुरवठा निरीक्षक धारेवर
इचलकरंजी येथे संजय गांधी निराधार योजना कार्यालया
कडून पाञ लाभार्थ्यांना सुविधांचा लाभ देण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत आज सोमवारी भाजपच्या वतीने पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
इचलकरंजी येथे संजय गांधी निराधार योजना कार्यालयामध्ये गेल्या अडीच वर्षापासून वृद्ध , निराधार,दिव्यांग नागरिकांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच अनेक प्रकरणे मंजूर असून देखील संबंधित पाञ लाभार्थ्यांना मंजुरी आदेश पत्राचे वाटप करण्यात आले नाही. अनेक प्रकरणे दाखल असून त्यांची यादीत नावेच नाहीत . दिव्यांग नागरिकांना २००९ च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता तत्काळ अंत्योदय योजनेतंर्गत लाभ देण्याची गरज आहे.असे
असताना देखील संबंधित अधिकारी गेली २ वर्षे नुसते आश्वासन देत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.याच अनुषंगाने आज सोमवारी भाजपच्या वतीने पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.तसेच मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी
पुरवठा निरीक्षक अधिकारी अमित डोंगरे यांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
यावेळी पुरवठा निरीक्षक श्री.डोंगरे यांनी सदर प्रकरणांचा प्राधान्याने विचार करून संबंधित पाञ लाभार्थ्यांना योजनांचा तात्काळ लाभ देण्याचे आश्वासन दिले.यावेळी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.पूनम जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे
माजी सदस्य विश्वनाथ कबाडी, दिव्यांग आघाडी अध्यक्ष दीपक लोखंडे, अमृत भोसले, सौ.अश्विनी कुबडगे, दीपक पाटील, सौ.सरला घोरपडे, सौ.नीता भोसले, हेमंत वरुटे, मयूर दाभोळकर, सौ.अनिता कुरणे, गंगा पाटील, अमित जावळे, प्रमोद बचाटे, सौ.नागुबाई लोंढे, वंदना कांबळे, सौ.पूजा बेडगकर, राजेंद्र पाटील, सुजय पवार, बबन कासार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.