रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवा – धोंडी चिंदरकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यातील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची मागणी मालवण तालूका भाजपाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केली आहे. यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे चिंदरकर यांनी स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरवर्षी असणाऱ्या पावसाचा आणि अतीवृष्टीचा विचारकरता या जिल्ह्यात जास्त रहदारी या निकषा खाली जे रस्ते येतात ते(मुख्यमंत्री ग्रामसडक आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ते) डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रेटीचे झाले तर दरवर्षी रस्त्यांना पडणारया खड्ड्याच्या साम्राज्यला आळा बसेल परिणामी तातडीने दुरुस्ती करता येईल. काँक्रेटीकरण खर्च जरी अधिक असला तरी वरचेवर दुरुस्तीच्या नावाखाली पैशाचा होणार अतिरिक्त खर्चाचा विचार करता बेजेट मध्येवाढ होतेच त्याच खर्चात ही कामे दर्जेदार होतील.
मोठ्या रस्त्यांची डागडुजी ज्या संस्थेला दिली जाते त्या ऐवजी ती देखभाल दुरुस्ती ज्या स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षेत्रातून जाते जसे ग्रामपंचायत आदी तर त्याची डागडुजी त्याच्या जवळ पैशाच्या तरतुदी सहित देण्यात यावी. आणि असे झाले तर कोकणात वारंवार खड्याच्या समस्येला लोकांना जे तोंड द्यावे लागते त्यांच्यातून सुटका होऊ शकते असे मत चिंदरकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे पावसाळ्यात डांबरीकरण करता येणार नाही तसे होणार नाही अशी अनेक कारणे कालबाह्य होतील असे चिंदरकर यांचे मत आहे. यासाठी माजी खासदार डाँ निलेश राणे यांच्या पुढाकाराने व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असून या विषयासाठी सर्वपक्षीयांनी, स्वायत्तसंस्थानी, सामाजिक संस्थानी सहकार्य करावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.