You are currently viewing सृष्टीचा नजारा”

सृष्टीचा नजारा”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री स्मिता रेखाडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”सृष्टीचा नजारा”*

तुषारांनी पुलकित धरणी
मदमस्त सुगंधाचा दरवळ
हिरवाई हा श्वास धरतीचा
नयनरम्य मखमली हिरवळ

चराचरातुन उमलली प्रसन्नता
श्रावणधारातुन मधुर संगीत
सासुरवाशीणीला माहेरची सय
मन घाली पिंगा वारा परसात |

शिरशिरी थेंबांची गाली ओघळता
पहिली सर जणु रुणुझुणू पैंजण
नादमय तालात वर्षे पर्जन्य धारा
सृष्टीचे शोभले अमृताने अंगण |

मनभावन तृणांकुर शालु अवनीला
मृदगंधाचा परिमळ सुगंधी कुपीत
नवथर उत्सुक जावया माहेराला
जीवलगाला उमगे अंतरीचे गुपित |

सृष्टीचा नजारा नदंनवन भासे
घननिळा बरसला बळीराजा चैतन्य
अंकुरला हिरवाईतुन धरतीचा श्वास
पानाफुलातुन गंधाळलेला धुंद पर्जन्य |

सौ.स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा