*गोळवण, मसुरे,आचरा, आडवली विभागाच्या बैठकांनाही शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
शिवसेनेने कोकणला भरभरून दिले आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कोकणवासियांसोबत अतूट नाते आहे. हे नाते कधीच कमी होऊ शकत नाही. शिंदे गटाच्या मागे पूर्णतः भाजप आहे. भाजप पक्ष पैशाचा वापर करून आमदार फोडू शकेल मात्र सर्वसामान्य जनतेला ते विकत घेऊ शकत नाही. पैशाच्या राजकारणातून शिवसेना संपवू पाहणाऱ्या भाजपला केव्हाही यश येणार नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्य लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. येणाऱ्या काळातही विकास कामे थांबणार नाहीत. उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.ज्या शिवसेनेने भाजपला सर्व काही दिले. त्याच शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी राज्यातील शिवसैनिक ठाम आहेत. उद्धवजींनी प्रामाणिक काम केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याबद्दल आत्मीयता व सहानुभूती निर्माण झाली आहे.प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता कायम राहते. त्यामुळे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण शिवसेनेच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील गोळवण, मसुरे, आचरा, आडवली जिल्हापरिषद मतदारसंघाच्या बैठका रविवारी संपन्न झाल्या.यावेळी शिवसेना संघटना वाढीसंदर्भात आ. वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. विकास कामांची माहिती देण्यात आली. या बैठकांना शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गोळवण येथे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, कृष्णा आंगणे, भाऊ चव्हाण, माजी पं. स. सदस्य कमलाकर गावडे, बी. जी. गावडे, उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, काकू गावडे, महिला विभाग प्रमुख प्रज्ञा चव्हाण, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, अजित पार्टे, अल्पेश निकम, शशांक माने, विजय धामापूरकर उपस्थित होते.
मसुरे येथे माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपतालुकाप्रमुख छोटू ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, विभागप्रमुख राजेश गावकर, उपविभागप्रमुख अमोल वस्त, उपविभाग प्रमुख सुहास पेडणेकर, हडी शाखाप्रमुख संतोष अमरे, ग्रा. पं. सदस्य पप्पू मुळीक उपस्थित होते.
आचरा येथे विभागप्रमुख समीर लब्दे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख जगदिश पांगे,अनिल गावकर, नारायण कुबल ,उदय दुखडे, श्रीकांत बागवे,राजू नार्वेकर, राजू हिर्लेकर,वायंगणी सरपंच रेडकर, माजी पं. सदस्या निधी मुणगेकर, महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर,माजी सरपंच श्री. घाडी,श्रीकांत बागवे उपस्थित होते.
तर आडवली येथे उपतालुका प्रमुख बाबा सावंत,विभागप्रमुख बंडू चव्हाण, संतोष घाडी, दीपक राऊत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, अमित फोंडके , अरुण लाड, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, शाखाप्रमुख सुनील सावंत, दुलाजी परब, सुभाष धुरी, युवराज मेस्त्री, दीपक किर्लोस्कर,युवासेना विभागप्रमुख बंडू गावडे आडवली सरपंच संतोष आडवलकर आदि उपस्थित होते.