You are currently viewing आपणं आपल मत विकलं काय* भाग २

आपणं आपल मत विकलं काय* भाग २

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती नियोजन अधिकार समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*आपणं आपल मत विकलं काय* भाग २

पारावर पहिल्या सभा होत होत्या त्यावेळी मतदान नव्हते लोक आपल्याच समाजातील आपला हक्काचा आणि आपल्यासाठी सुखात दुःखात पुढं येणारा माणूस समाजप्रतिनीधी म्हणून पुढे करत असतं. आणि हा समाजांचा प्रतिनिधी कोणतीही वैयक्तिक फायदा न बघता फक्त आणि फक्त समाजासाठी आपला अनमोल वेळ आपले सर्व जीवन घालवत असत
काळ बदलला आणि याच समाज प्रतिनिधी यांना सत्ता आणि पैशांची भुक लागली आणि येथूनच सुरवातीला म्हणजे ग्रामपंचायत मिनी मंत्रालय अस्तित्वात आले आणि यासाठी काम करणारे समाज प्रतिनिधी हे लोकांच्या मतदान प्रक्रिया मधून निवडले जाऊ लागले म्हणजे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडी सुरवातीला लोक आपलयातूनच करतं असतं पण नंतर याच निवडी चिठ्ठी पध्दतीने होण्यास सुरुवात झाली. आणि सर्वात शेवटी सर्वात निच दर्जाचे राजकारण गजकर्ण ही संकल्पना लोकांनीं अंमलात आणली आणि गावातील राजकारण सर्वात खालच्या दर्जाचे असते ते खरे आहे ‌ . कारणं मतदान मिळविण्यासाठी जातीयवाद. प्रांतवाद. गुंडगिरी. पैशांचा वापर. धार्मिक वाद. प्रचार माध्यम. मतदारांवर दबाव. उमेदवार यांना उचलून नेणे. डांबून ठेवणे. असे विविध माध्यमातून मतदान केलं जातं.
लोकांनी आपला घरचा आणि समाजांचा एखादा तरी हक्काचा माणूस ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. जिल्हा परिषद. पंचायत समिती. आमदार.खासदार . मंत्री. पुढारी. या आणि अन्य जागेवर आपल्या अनमोल मताने समाजांचा हक्काचा माणूस निवडून दिला जातो. आणि एक वेळ अशी येथे की ज्या समाजाच्या नावांवर म्हंजे अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. इतर मागासवर्गीय. अशा विविध प्ररवगाला निवडणूकीत आरक्षण देण्याचा आपल्या संविधानात तरतूद आहे. पण आज सर्वत्र जातींचे भांडवल करुन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री झाले आणि त्यांनी समाजासाठी काय केलं याचा कधी आपण विचारच केला नाही. मुस्लिम समाज असो वा कोणताही समाज असो ज्या ज्या नेत्यांनी समाजांचे जातींचे भांडवल केले त्यांनी समाजाला आपल्या बोटावर माकडासारखे नाचविले आहे आणि अजून आपणं नाचत आहोत ही परस्थिती बदलायला हवी त्यासाठी समाजांचा प्रतिनिधी जर समाजांचा वापर फक्त आणि फक्त मता पूरता करत असेलतर त्याला निवडून देताना त्याचे निवडणूक काळात वाटप करण्यात येणारे पैसे. वाटलं जाणारे मटन दारू. यावर अगोदर बहिष्कार टाका. यासाठी समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे
मतदान निर्दोष व्हावे त्यातून लोकांच्या मतांचा कौल स्पष्टपणे व्हावा ‌मतदार यांनी निर्भयपणे व मुक्त वातावरणात मतदान करावे यासाठी निवडणूक मंडळ काम करत असतें.हे आपणं बघितले आणि अनुभवले आहे ‌ परंतु केवळ कायदेशीर तरतुदी व यंत्रणा असल्या म्हणजे पुरेसे आहे असं नाही. आपण सुद्धा सतर्क राहावे लागणार आहे. अखेर लोकांचा निवडणुकीत मतदानाचा हक्क भयमुक्त बजाविता आला पाहिजे. त्यांच्याकरीता राजकीय दबाव गुंडगिरी नसावी.राजकीय प्रलोभन नसावी. पण आपणांस यांचा अनुभव कायमचं येत असतो.जवळपास चाळीस वर्षे आपणं विविध राजकीय पातळीवरून निवडणूकीसाठी मतदान करत आलो आहे ‌आपलया चाळीस वर्षांचा निवडणूकीचा आणि मतदान याचा अनुभव आपल्या राजकीय सहभागाचे स्वरूप व त्यांच्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यास सहहयाभूत ठरेल म्हणून तयाचा विचार करणे हे आज काळाची गरज आहे .
मताधिकार यामुळे या देशातील अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तिला राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी अशी संधी ठराविक लोकांना मिळत असे.या नव्या संधिमुळे लोकांना अनेक दृष्टींने त्यांच्या राजकीय जीवनाचा चैनीचे जीवन जगण्याचा फायदा झाला आहे. दिवसेंदिवस मतदानामधये सहभागी होणा-या चे प्रमाण वाढत चालले आहे.तसेच लोक राजकीय दृष्ट्या जागरूक होऊन जाणीवपूर्वक मतदान करताना कोणीही दिसतं नाही.या आणि यासारख्या अनेक गोष्टी या प्रक्रियेत जमेची बाजू नाही.तयाचा आपण तपशील प्रमाणे विचार करण्याची गरज आहे.
सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तहसिलदार कार्यालय महसूल विभाग पुरवठा विभाग. नगरपालिका. महानगरपालिका. महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग आरोग्य विभाग. अशा विविध ठिकाणी काय काम असतं. की त्यासाठी तुम्हाला सरपंच उपसरपंच सदस्य . नगरसेवक. यांची गरज भासते. मला एक सांगा कोणीही आपला घरफाळा. पाणीपट्टी. लाईट बिल. माफ करत नाही कोणतंही काम लाच दिल्याशिवाय होतं नाही मग कशासाठी अश चोरा़ची गरज आहे म्हणूनच निवडणूक आली की माझं पाकीट आल नाही. म्हणणारे. पैसा आल्याशिवाय मतदार न करणारे. आज कोणाचें जेवन आहे. कोणाची दारू मिळेल का. हा विचार करणारे आपणं खरोखरच मुर्ख आहोत आपणास कधीही कशाचीही लाज वाटली नाही आणि असेच राहिलें तर एक वेळ सायकल घेण्याची लायकी नसणारे आज फोरचुनर मधून फीरत आहेत. वडिलोपार्जित विस गुंठे जमीन पण आज दोनशे ते तिनसे एककर जमीन लाखों कोटींची स्थावर मालमत्ता. मोठमोठे अपार्टमेंट बिल्डिंग हे यांना मिळवून देणारे आपलेच अनमोल मतदान आहे. ताकद आपली ओळखा.
लोकशाहीत मत भिननतेला वाव असतो.तरिदेखील शेवटी आपली ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती जिल्हा परिषद व अन्य विभाग कसे चालावे कोणी चालवावे कोणाच्या हातात या चाव्या असाव्या ‌यासाठी सहमतीची आवश्यकता असते. अशी सहमतीने विचारविनिमय वाटाघाटी फारसे न ताणता देवघेवीचे मार्गाने.व एकामेकाशी संवाद साधून निर्माण केली जाते ‌यातून राजकीय वातावरणात एक प्रकरचा खुलेपे. मोकळेपणा निर्माण होतो.आपलया भारतासारखा खंडप्राय आणि विविध हितसंबंधी गटांचे अस्तित्व असलेल्या विविधता पूर्ण देशांत तर अशा खुलेपणाचे फार मो‌ठे महत्व आहे ‌हा खुलेपणा कायम टीकवून धरण्यासाठी लोकांमध्ये एक विश्वास जागता राहवा लागतो ‌आणि हे कार्य मतांमुळे शक्य आहे.मताधिकारामुळे सर्व नागरिकांना समान दर्जा मिळतो व ते सर्वजण परस्परांशी समान पातळीवरून संवाद करु शकतात.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा