बांदा
येथील माजी सरपंच बाळा आकेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मिलिंद परुळेकर, सिद्धार्थ गाड, संदेश महाले, अमोल सावंत, प्रवीण गाड, सर्वेश महाले, श्री शिरोडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षी आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात येते. कोरोना कालावधीत देखील पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याहारीचे वाटप करण्यात आले होते.