You are currently viewing उमेद फाउंडेशन मार्फत ओझरम नं.१ वसतिगृहातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उमेद फाउंडेशन मार्फत ओझरम नं.१ वसतिगृहातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

तळेरे – प्रतिनिधी

 

उमेद फाउंडेशन सेवा परिवार यांच्याकडून ओझरम येथील शाळेत शिकणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थांना उमेदचे संस्थापक सन्मा . श्री . प्रकाश गाताडे सर ,गावचे सरपंच सन्मा . श्री . प्रशांत राणे , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्मा . श्री . सुहास पाताडे साहेब , कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा . श्री . संजय पवार सर , खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा . श्री .सद्गुरू कुबल सर , साळीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा . श्री .गोपाळ जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .

यावेळी उमेदचे संस्थापक श्री . प्रकाश गाताडे सर म्हणाले की , आम्हांला शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या , तशा अडचणी या विद्यार्थांना येऊ नयेत यासाठी तसेच निराधार , गरीब व वंचित मुलांकरीता उमेद जाणीवपूर्वक काम करते . या समयी उमेदचे संस्थापक सदस्य श्री . नवीनचंद्र सनगर सर , श्री . राजाराम पात्रे सर , श्री . प्रदिप नाळे सर , श्री . नितीन पाटील सर , श्री . युवराज पचकर सर, श्री .विक्रम म्हाळुंगेकर सर , श्री . जाकीर शेख सर , श्री . श्रीराम विभूते सर , सामाजिक कार्यकर्ते श्री . बंडू राणे , श्री . तेजस साळुंखे , मुख्या . श्रीम .स्नेहल कदम मॅडम , श्री विनायक जाधव सर आणि केंद्रातील शिक्षक वर्ग उपस्थित होते .

उमेश फाउंडेशन ने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 300 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्धाश्रम तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांसारखे सुद्धा उमेदचे उपक्रम गरजूंसाठी सातत्याने सुरू आहेत..

उमेद फाउंडेशनने वसतिगृहातील व शाळेतील विद्यार्थाना शै . साहित्य वाटप केल्याबद्दल शा . व्य . समिती व मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी आभार व्यक्त केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा