You are currently viewing अजुनही ती गृहीतच का?

अजुनही ती गृहीतच का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी श्रीकांत धारकर यांचा अप्रतिम लेख*

 

*अजुनही ती गृहीतच का?* 👱🏻‍♀️👩🏻🧕🏻👵🏻

 

मी ऑफीस मधुन जरा उशिराच घरी पोचलो … म्हटल आता सौ आपल्यावर चिडणार … रागावणार…. मग काही वेळ अबोला … मग हळूच तिरपा कटाक्ष टाकणार … मग गालात हसु फुटणार… मग मी पण थोडा हसल्या सारख करणार … यात थोडा वेळ जाणार … मग हळुच पाण्याचा ग्लास भरून आणणार… पाणी काठोकाठ मुद्दाम भरणार… जेणेकरून तो पाण्याचा ग्लास हातात घेउन ओठाला लावे पर्यंतचा प्रवासात

ते पाणी … एक किवा दोन वेळेस अंगावर सांडेल .. अंगावर पाण्याचा अभिषेक झाला रे झाला.. कि माझ्या बॉडी लॅग्वेज वरून …. खुदकन हासायच…

आणि चहा गाळायला लगेच किचन मध्ये निघुन जायच…. अस काहीस नेहमीच चित्र माझ्या समोर नियमित असायच… आजही तसच काहीस घडणार …

अशी मनाशी गाठ बांधुनच मी डोअर बेल वाजवली…. दार ढकलल… तर दार उघडल्या गेल .. म्हटल अरे दार तर उघड च आहे … मनात विचार करत करत घरात आलो … कानोसा घेतला सौं च काय सुरु आहे?

आवश्यक ठिकाण बघीतली..

सौ.चा ठिकाणा नाही … अरे गेली कुठे? अस म्हणत मी बेडरुम मध्ये डोकावल .. सौ पांघरूण घेउन डोक्याला बांधुन शांतपणे झोपली होती … मला धस झाल … थोड आणखी जवळ गेलो… सौ . च्या माथा बघीतला. तर. चांगलाच तापलेला

होता … माझी चाहुल लागताच

सौ ने किलकिले डोळे करून बघीतल… ” काहो आले का?

आज उशिर झाला वाटते यायला”

सौ वदली

” हो झाला थोडा उशिर.. पण काय ग काय झाल चांगलीच तापली तु त ताप आहे का संताप”? मी

” अहो मला दुपार पासुनच जर ताप येउन राहिला अस वाटत होत म्हणुन मी अंग टाकल तर चांगलच भरून आल..” सौं

” अहो तुम्हाला काही चह पाणी काही देउ का? ” सौ

 

” झाल तुझ बोलून जरा पडून रहा

मी घेतो मला काय पाहिजे ते”

मी म्हणालो

अस म्हणत असताना सौ च्या चेहरा समाधानाची एक लकेर मला दिसली … नेहमी आपण आपल्या कलिग ला नेहमी गृहीतच का धरत असतो?

आपल्या हट्टापायी आपण दुसऱ्याचा विचारच करत नाही …

यामुळे काय होते विचाराची

समजुन घेण्याच्या वृत्तीची दरी

वाढत जाते हे मुळात कोणाच्या लक्षात येतच नाही … मी घरी येताना मनात जे चित्र रंगवल होत तस काही घडल नाही … नेहमी आपण असच का गृहीत धरतो…

काही समजत नाही .. म्हणतात ना

” ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्त असु द्यावे समाधानी””

म्हणुन तसेच रहावे असे नाही परिस्थीती कोणतीही असो आपण समाधानी असायला हवे .. कोणतीही परिस्थीती बदलायला आपण स्वतः पासून सुरवात करायला हवी… म्हणुनच मी लगेच सौ ला दवाखाण्यात नेले…

कोणतीच काळजी करू नको मी आहेना असा विश्वास दिला आणि दोन दिवस रजा घेउन घरीच थोबलो… सर्व काही सौ नेच करावे प्रत्येक वेळेस तीनेच सर्वकाही करावे असे आपण गृहीत धरतो तेच मुळात चुकिचे आहे… कधी कधी स्वतः सर्व काही जबाबदारी घेउन पहा … सर्वकाही गृहीत धरण्याचा स्वभाव बदलला जाईल .. एक वेगळाच आनेद .. वेगळीच अनुभुती आल्याशिवाय रहात नाही … स्वतः बदला म्हणजे जग बदलेल

… यात शंकाच नाही…

नाही का?

 

श्रीकांत धारकर

बुलडाणा

प्रतिक्रिया व्यक्त करा