You are currently viewing महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; विधिमंडळाकडून पत्रक जारी, कारण गुलदस्त्यात

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; विधिमंडळाकडून पत्रक जारी, कारण गुलदस्त्यात

मुंबई :

 

१८ जुलैपासून सुरु होत असलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. मात्र, हे अधिवेशन पुढे ढकलण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरु होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा