ओरोस
आवळेगाव येथील कृषी महाविद्यालय ओरोसच्या कृषी कन्यांची गावातील शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. या कृषीकन्या शेतकऱ्यांना तरवा काढणे, लावणी, या सारख्या कामात मोठी मदत करत आहेत. यासोबतच कृषी कन्यांनी आपल्या ज्ञानातून व प्राचार्य एस.पी. सामंत, कार्यक्रम समन्वयक एन.ए. साईल, प्राध्यापक डॉ.एल.एस. व्यवहारे, डॉ.पी.जे.खोसे, जी.डी. गायकी, ए. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना ‘चार सूत्री’ भात लागवडीचे प्रशिक्षण दिले. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष; “आनंदी व समृद्ध गाव” योजनेचे जनक तथा माजी खासदार ब्रिगेडियर श्री. सुधीर सावंत यांच्या “नैसर्गिक शेती” संकल्पनेतून गिरीपुष्प (ग्लिरीसिडीया) झाडांची पाने चिखलणीपूर्वी वापरून आवळेगाव गावात यशस्वीरीत्या “चारसूत्री पद्धतीने भात लागवड” प्रात्यक्षिके श्री. समेश गावकर यांच्या शेतात सादर केली. यावेळी आवळेगाव (ओरोस खुर्द) गावचे पोलिस पाटील मा.श्री. अनंत मेस्त्री यांची उपस्थिती लाभली.कृषी कन्यांनी tractor हाती घेत गावात आपला एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचबरोबर गावात कृषी दिन साजरा करून काजूच्या वृक्षांची वृक्षलागवड देखील या कृषीकन्यांनी केली.त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती या कृषीकन्या देत आहेत. या गटामध्ये कृषीकन्या- वैष्णवी हळदणकर(गटप्रमुख),प्रणोती माधव, करिष्मा परब, हर्षा तावडे, अर्पिता माईनाक. आदींचा समावेश आहे.