You are currently viewing परिस्थितीला शरण जाऊ नका त्यावर मात करा – अनिल गवस

परिस्थितीला शरण जाऊ नका त्यावर मात करा – अनिल गवस

(स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव मोहिते फेम बांदागावचे सुपुत्र अनिल गवस यांचे प्रतिपादन)

 

कुडाळ :

परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा मी कोण होतो. यापेक्षा मी काय आहे माझ्याकडून समाजाच्या आणि माझ्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करा; म्हणजे आवडते त्याचे पूजन करा व जे आवडत नाही त्याचा त्याग करा, असे उद्गार हंबीरराव मोहिते फेम अनिल गवस यांनी काढले. ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी स्वतःबरोबर इतरांच्या गुणावर प्रेम करा. आपल्या अवतीभवतीच्या व्यक्तीतून चांगले असतील. ते गुण घ्या नकारात्मकता टाळा, अहंकार दूर सारा, असे सांगत इतरांच्या निरीक्षणातून आपल्यातील कलाकार घडत असतो. याचे भान ठेवा. देश तसा वेश करत आपली संस्कृती जपा. असे आवाहनही केले .त्याचबरोबर आपण सामान्य कुटुंबात असूनही आपण कसे घडलो ?कामगार मंडळाच्या हौशी नाट्य प्रयोग स्पर्धा मधून भाग घेताना चे अनुभव ,त्याचबरोबर आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आपण भूमिका कशी जगली पाहिजे हे सांगत अभिनय क्षेत्रातील विविध अनुभव,स्वराज्य संरक्षक संभाजी मालिकेतील विविध किस्से ही त्यांनी उपस्थितांसमोर कथन केले. (कोकणातील तरुणांमध्ये गुणात्मक जास्त आहे. त्याला ऊर्जितावस्थेमध्ये आणण्यासाठी आपण अभिनय क्षेत्रासंदर्भात एक वर्कशॉपही येथे आयोजित करणार असल्याचे सांगितले) आपल्या जडणघडणीतील मोठ्या बहिणीचे- आईचे योगदान त्यांनी कथन केले.

यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे व रात्र महाविद्यालयाचे प्र.प्रचार्य अरुण मर्गज,बी.एडचे प्राचार्य परेश धावडे नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उप प्राचार्य कल्पना भंडारी सीबीएससी बोर्ड सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, बांदा विभागातील दै.सकाळचे पत्रकार निलेश मोरजकर, प्रशांत गवस इत्यादी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सीबीएससी चा शुभाव शेख, फिजिओथेरपी महाविद्यालयची मृणाल खानविलकर, राजा परब, नर्सिंग महाविद्यालयाचा सिद्धेश चव्हाण, बीएडची छात्र अध्यापिका प्राजक्ता परब, यांनी मनोगतें व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर ,प्रस्ताविक मर्गज तर उपस्थितांचे आभार प्रा.सुमन करंगळे- सावंत यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा