मुंबई :
कुर्ला येथील कुटुंबातील पाच सदस्यांना बलात्काराच्या प्रकरणात गुंतल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
३८ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की (Middel- East) UAE सारख्या ठिकाणी नोकरीच्या मोबदल्यात कुटुंबीयांनी तिच्याकडून पैसे घेतले आणि वारंवार तिचे लैंगिक शोषण केले.
या गुन्ह्यात सामील असलेल्या गुजरात मधीलपैकी आणखी दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच कासिवडा कुर्ला येथे राहणारे आरोपी सलीम सिद्दीकी (६५), त्याची पत्नी रुकसाना (५२) आणि त्यांची मुले अखील (वय २७) , फिरोज (वय २६) आणि फराहीन (वय २५) अशी करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लबडे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी कुटुंबांना भेटल्यानंतर सप्टेंबर २०१९ ते मे या दरम्यान ही घटना घडली.
“पीडित महिला हीआपल्या कुटुंबासमवेत नालासोपारा (डब्ल्यू) च्या समईपाडा येथे भाड्याने राहत असे. आरोपी कुटुंबातील एक जण बर्याचदा पीडितेच्या ठिकाणी जायचा आणि तिच्या एका भेटीदरम्यान सलीमने पीडित मुलीला सांगितले की आपण तिला सौदी अरेबियामध्ये नोकरी मिळवू शकेन आणि तिला नोकरी व राहण्यासाठी पैसे मागितले. वेळोवेळी पीडित मुलीने सिद्दीकी दाम्पत्याला २ लाख रुपये दिले असल्याचा दावा केला.
त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवासस्थानी असताना पीडितेला फराहिनने शुद्ध हरपण्याचे औषध दिले आणि ती म्हणाली की ती लवकरच ती बेशुद्ध पडली काही तासांनी पुन्हा जाणीव झाली. “महिलेने असा आरोप केला की रुक्सानाची मुले अकील आणि फिरोजने तिला काही अश्लील छायाचित्रे दाखविली आणि त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.
तिने सांगितले की, आरोपींनी वारंवार तिचे लैंगिक शोषण केले आणि गुजरातमधील वेणम आणि विजय खटियार या दोघांनाही असे करण्यास सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जेव्हा हे शोषण चालू होते,तेव्हा त्या महिलेने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तक्रार दाखल केली.”
पोलिसांनी कलम ३७६(२) (एन) ( महिलेवर वारंवार बलात्कार करण्या प्रकरणी), तसेच ५०६ (फौजदारी धमकी देणे), ५०७ (अज्ञात व्यक्तीने फौजदारी धमकी देणे) आणि १०९((कायदा दाखवल्यास त्यासंदर्भात शिक्षा) अशी गुन्हा दाखल केला आहे.