You are currently viewing आजपासून वेंगुर्ले देव रामेश्वरच्या भजनी सप्ताहास प्रारंभ

आजपासून वेंगुर्ले देव रामेश्वरच्या भजनी सप्ताहास प्रारंभ

वेंगुर्ला :

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराच्या अखंड भजनी सप्ताहाला गुरुवार १४ जुलैपासून प्रारंभ होत असून दररोज होणाऱ्या अष्टोप्रहर भजनांबरोबरच १५ संगीत व वारकरी भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे.

श्री रामेश्वराच्या प्रसिद्ध भजनी सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात बेल, फुले यासह खेळणी, हॉटेल्स आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत.

सप्ताह कालावधीत रोज होणाऱ्या अष्टोप्रहर भजनांबरोबर १४ भजनी मंडळांना निमंत्रित केले आहे. १४ रोजी सायं. ७ वा. विठ्ठल पंचायतन सांप्रदाय- सुरंगपाणी, रात्रौ ८.३०अरतकर भजन मंडळ -आनंदवाडी, १५ रोजी सायं. ७ वा.जनता सेवा भजन मंडळ- परबवाडा, रात्रौ८.३० वा. दत्तप्रसादिक भजन मंडळ- कुबलवाड,रात्रौ ९.३० वा. अचानक भजन मंडळ , १६ जुलै रोजी सायं. ७ वा. ओमकार भजन -मंडळ आडारी, रात्रौ८.३० वा. सद्गुरु भजन मंडळ- तुळस ,१७ जुलै रोजी सायं. ७वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ- नमसवाडी , रात्रौ८.३० वा. वाटोबा भजन मंडळ- उभादांडा, १८ जुलै रोजी सायं. ७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ- रेडी ,रात्रौ८.३० वा. देऊळवाडा भजन मंडळ- वेंगुर्ला, १९ जुलै रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ- भेंडमळा,रात्रौ८.३० वा. बागायतवाडी भजन मंडळ- शिरोडा ,२० जुलै रोजी सायं. ७ वा. मूळपुरुष भजन मंडळ- वडखोल ,रात्रौ८.३० वा. धावडेश्वर भजन मंडळ- कॅम्प आदी मंडळांची भजने होणार आहेत .भाविकांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा