*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना*
श्री गुरुदेव दत्त ||
सर्वसाक्षी सर्वेश्र्वरा
गुरुरुपा तूच आता
टाक कृपा कटाक्षासी
दर्शन दे मज आता. १
अनुसूया श्री नंदना
तुज करुनी वंदना
कर जोडोनिया तव
करी करूणानिधाना २
शांत चंद्र भाळी शोभे
शिरी गंगा वाहता हे
भेट देई गुरूनाथा
भक्त तुझा वाट पाहे. ३
शेषाचे करुनी आसन
विश्रांती घेई श्रीहरी
चरणासी लक्ष्मी बसे
शंख चक्र त्याचे करी. ४
कमलावरी बैसूनी
स्थिती, लय ती साधूनी
तात नारदाचा राहे
लीन विष्णुच्या चरणी. ५
काखेत झोळी शोभते
पुढे श्वान उभे असे
अनुसूया नंदन तो
नित्य मज स्वप्नी दिसे. ६
ऐसे दिसे मज रूप
तीन शिरे सहा हात
अनाथांचा तूच नाथ
तूच माय तूच तात. ७
सौ. अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
श्री गुरुपौर्णिमा
१३/७/२०२२