बांदा
रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे बुधवार दिनांक 13 जुलै रोजी आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे सायंकाळी चार वाजता गरजू होतकरू मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने या कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरूंचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.शामराव काळे, बँक ऑफ इंडिया बांदाचे शाखाप्रबंधक अंकित धवन, जी एस आर रो.आनंद रासम असिस्टंट गव्हर्नर रोटरियन नीता गोवेकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे सेक्रेटरी रो. प्रमोद भागवत बांदा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रो.मंदारजी कल्याणकर व्हाईस प्रेसिडेंट रो.प्रमोदजी कामत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे यांनी केले व या कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन तुषार धामापुरकर हे होते.
प्रास्तविक प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी केले यामध्ये बांदा रोटरी चा अहवाल व भविष्यातील होणारे प्रकल्प याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डीजी गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांच्या संकल्पनेतून गर्ल्स पेडल पावर या प्रोजेक्ट मधून या सायकली मुलींना देण्यात आल्या. बांदा रोटरी मधून दहा सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी नीता गोवेकर, आनंद रासम यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक काळेसाहेब व अंकित धवन यांनी आपले विचार मांडले.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने श्री.गणेश गर्दे सर व ज्येष्ठ मूर्तिकार सुरेश गुळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बांदा रोटरीचे सेक्रेटरी फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर सुदन केसरकर, सुधीर शिरसाठ, प्रवीण शिरसाठ सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, स्वप्निल धामापूरकर ,पिंटू गायतोंडे मनसुख वासानी, डॉक्टर जगदीश पाटील, सचिन मुळीक, स्वागत नाटेकर, संदीप देसाई, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ ,संजय शिरोडकर रत्नाकर आगलावे ,शिवानंद भिडे ,योगेश परुळेकर ,श्वेता कोरगावकर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार फिरोज खान यांनी मानले.