दुसरा हप्ता वितरीत: जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींसाठी साडेदहा कोटीचा निधी
सिंधुदुर्ग :
राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बंधित दुसरा हप्ता १५ व्या वित्त आयोगांतर्गत वितरित करण्यात आला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गला सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
या निधीचे वितरण करताना१०:१०:८० या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना प्रत्येकी १० टक्के तर ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी वितरित करण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींसाठी ६५ लाख ५७ हजार ६९७ तर दोडामार्ग पंचायत समितीकरिता ९ लाख ३२हजार १२८रुपये, सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतसाठी १कोटी ७५ लाख ८१ हजार २९ रुपये तर पंचायत समितीसाठी २३ लाख १२ हजार ७९१ रुपये निधी मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी १कोटी ४ लाख ४१ हजार ६३६ तर पंचायत समितीसाठी १२ लाख ८४हजार, कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ९५ लाख ७७ हजार ३७५ तर पंचायत समिती साठी २५ लाख २० हजार ६१३ रुपये निधी मिळणार आहे.
मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ३२ लाख ४३हजार ४५८रुपये तर पंचायत समिती साठी १७ लाख २८ हजार ८७१,कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ६८ लाख ४ हजार २६९ तर पंचायत समितीसाठी २२लाख २३ हजार ५६७ ,देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ४९ लाख ४० हजार २७४ तर पंचायत समिती साठी १९ लाख ८१ हजार ५४४ व वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी ५९ लाख ६ हजार ४६४ व पंचायत समिती साठी ८ लाख ४३ हजार ५९८ एवढा निधी मिळणार आहे.
आठही तालुक्यातील ४३१ ग्रामपंचायतींसाठी मिळून १० कोटी ५० लाख ५२हजार २०२, आठ पंचायत समित्यांसाठी १ कोटी ३८ लाख २७ हजार११२ व जिल्हा परिषदेसाठी १ कोटी ३८ लाख २७ हजार ११२ असे मिळून एकूण १३कोटी २७लाख सहा हजार रुपये ४२६ रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.