You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 12 ऑक्टोबरला “जनता दरबार “चे आयोजन – निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे…
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 12 ऑक्टोबरला “जनता दरबार “चे आयोजन – निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे…

सिंधुदुर्गनगरी :  

जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12 ते 2 या कालावधीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” आयोजीत करण्यात आला आहे.  या जनता दरबराचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.
सदरचा “जनता दरबार” डी.पी.डी.सी. चे नविन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजीत करण्यात आला आहे. तरी जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व सुरक्षित अंतर पध्दतीचा अवलंब करुन सहभागी व्हावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा