You are currently viewing गुरू

गुरू

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर यांची गुरुप्रति आदर व्यक्त करणारी काव्यरचना

जगातील तेजस्वी
गुरू एक तारा
ज्ञानाचा सागर
शांत किनारा

गुरू माझा तात
गुरू अंतरात्मा
चराचरी दिसे तो
गुरू परमात्मा

दाविती सन्मार्ग
देई जीवना आकार
चालता सन्मार्गावर
होती स्वप्ने साकार

निस्वार्थ भावाने
जीवन उजळतो
ज्योतीसम जळून
निरंतर तेवतो

*🖊©सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा