लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर, गोवा यांची अप्रतिम काव्यरचना
पर्जन्यधारांत न्हात…
धरा सुस्नात…
गंध ओला पावसाळी
मृदगंधात डोले नव्हाळी…
काळीमाय हिरवी पोपटी
तृण अंकुरी पागोळ्या घरटी…
ओल्या मातीत चालता…
भिजल्या पावलांना पैंजण
तुषार इवल्याशा ओंजळीत
मनी आनंदाचे कोंदण…
पाऊस मनातला…
ओथंबलेले घन
धारांसवे आभाळी झोका
घेऊन भरारी मन….
मनी साठवलेला पाऊस…
कधी कोसळणारा…
तर रिमझिम संथ
तृषेला सुखावणारा….
रानावनात कोसळत…
हिरव्या शिवारात…
कधी धुवाधार
तर, दडून बसणारा…
तर, कधी मुसळधार…
नित्य नवनवे रंग दाखवत..
अवचित येणारा… पाऊस
वादळवाऱ्यासवे.. धुसमसळत
पाऊस तरीही,
तनामनाला हवाहवासा…
पाऊस म्हणजे जीवन
आयुष्यातला सखा
पाऊल वाटेवर हवा
मात्र तो सोबत सारखा…..!
मानसी जामसंडेकर
गोवा