जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम मोरे यांची अप्रतिम गझल रचना
बंद केले पापण्यांचे दार आता
शोधतो मी वेदने आधार आता
काय सांगू कालचा इतिहास माझा
आपले जर मांडती व्यापार आता
सौख्य होते लाभलेले काल परवा
पावसाने मोडला संसार आता
दाटला अंधार मोठ्या संकटाचा
विठ्ठला बा तूच रे परिहार आता
आजही गोंजारतो जखमा जुन्या मी
सोसण्या ते दुःख मी कसदार आता
*जयराम मोरे सोनगीर*