You are currently viewing डॉ. अशोक जीवन सुर्वे यांची रुग्णसेवेची ५० वर्ष पूर्ण

डॉ. अशोक जीवन सुर्वे यांची रुग्णसेवेची ५० वर्ष पूर्ण

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील सर्व सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अशोक जीवन सुर्वे यांनी आपल्या रुग्णसेवेची ५० वर्षे ११ जुलै २०२२ ला पूर्ण केली. यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. विकासभाई सावंत, सचिव व्ही. बी.नाईक सर, खजिनदार सी.एल. नाईक ,शाळा समिती अध्यक्ष डॉ.दिनेश नागवेकर, संचालक सतीश बागवे यांनी डॉ. अशोक सुर्वे आणि त्यांच्या पत्नी सौ. अनघा सुर्वे यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला.

डॉ.सुर्वे यांचे बालपण प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. एम.बी.बी.एस. पदवी त्यांनी मुंबई घेतली. तरीसुद्धा पदवी प्राप्त होतास दुसऱ्या दिवशी ते देवगड पडेल ती प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून हजर झाली. तेथे पाच वर्षे सेवा करून सावंतवाडी शहरात आले आणि वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. आजही डॉक्टरांचा दवाखाना आहे तसाच आहे.

पन्नास वर्षांपूर्वी एम.बी.बी.एस. पदवी घेतलेले डॉक्टर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळच होते. मोठ्या शहरात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही तालुक्याच्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल काढून चांगली आर्थिक कमाई करता आली असती, किंवा महाराष्ट्र शासनाकडे नोकरी करून वर्ग -१ एक अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असती. परंतु डॉक्टरांनी तसे केले नाही. ४० वर्षांपूर्वी चौकुळ, कुणकेरी वगैरे सारख्या ग्रामीण भागात स्वतःच्या वाहनाने जाऊन रुग्ण सेवा केली.

५९ वर्षे रुग्ण सेवा हे वृत्त मानून सावंतवाडी शहरात रुग्ण सेवा देणारे डॉ. सुर्वे यांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा! त्यांना दीर्घायुष्य ,आरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

प्रतिक्रिया व्यक्त करा