नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे महालक्ष्मी विद्युत निर्मिती केंद्राला पत्र : दोडामार्ग शहराची होणार बत्ती गुल होण्यातून सुटका?
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात मोठा विद्युत प्रकल्प आहे मात्र त्याचा फायदा दोडामार्ग तालुका किंवा ग्रामीण भागाला होताना दिसत नाही. कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत तर याहूनही वाईट परिस्थिती असून वारंवार विज जाण्याचे प्रमाण जास्त आहे, यामुळे व्यासायिकांबरोबर नागरिकांनाही कठीण समस्याना तोड द्यावे लागत असून तिराळी येथे आसलेल्या महालक्ष्मी विद्युत निर्मिती केंद्रातून कसई दोडामार्ग शहराला विद्युत पुरवठा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी महालक्ष्मी विद्युत निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, माजी नागरसेवक सुधीर पनवेलकर, माजी नगरसेवक संतोष म्हावळणकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर चांदेलकर आदी उपस्थित होते.
मात्र नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या या पावलाने आगामी काळात दोडामार्ग शहराची बत्ती गुल होण्यापासून सुटका होणार का?; असे झाल्यास नागरध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांची टीम ही दोडामार्ग विकासाचे नवे शिल्पकार नक्कीच ठरतील, यादृष्टीने लागेल ती मदत नगरपंचायत कडून करण्यास आपण तयार आसल्याचे यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी कबूल कले असून माझा दोडामार्ग विकसित होण्यासाठी व अनेक समस्यातुन या दोडामार्ग वासीयांची सुटका करण्यासाठी आपण कायमच कटिबद्ध असल्याचे चेतन चव्हाण यावेळी म्हणाले.