You are currently viewing कळसुलीत विकासकामे करताना पर्यावरणासोबत पशुधनाचा विचार करावा –  सुशांत दळवी

कळसुलीत विकासकामे करताना पर्यावरणासोबत पशुधनाचा विचार करावा –  सुशांत दळवी

कणकवली

कळसुली दिंडवणेवाडी धरण प्रकल्पात नव्याने बांधलेला पुलाचा भराव पाण्यामुळे वाहून गेला त्यामुळे गावातील जनावरांची जाण्याची वाट पूर्णपणे बंद झाली झाली आहे तरी संबंधित घटनेची माहिती मिळताच याची दखल घेत रात्रीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत दळवी यांनी कळसुली गावातील शिवराम गावकर ,संतोष गावकर ,सुहास गावकर, रामदास गावकर ,गणेश गावकर तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत परब, नंदकिशोर परब सुरज घाडिगावकर त्यांच्यासोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर लगेच संबंधित अधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्यासंदर्भात काही पर्याय सुचवलेले आहेत तरी पावसाचा जोर कमी होतात त्याची दुरुस्ती करून जनावरांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात येईल असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा