कणकवली नगरपंचायत व पोलीस प्रशासनाची कार्यवाही
कणकवली
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्विस रोड मधील पुतळा स्थलांतरण केल्यानंतर आता पुतळ्याच्या ठिकाणी असलेला हायमास्टचा पोल हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमार्फत जेसीबी द्वारे हा पोल हटवण्यात आला.
दरम्यान हा पोल हटवल्यानंतर या ठिकाणी जुन्या पुतळ्याच्या जागी असलेली रस्त्याचा भाग हा डांबरीकरण करून प्लेन करण्याची गरज आहे. महामार्ग प्राधिकरण व हायवे ठेकेदार कंपनी यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. सर्विस रस्त्यावरील पुतळा स्थलांतरण केल्यानंतर गेले दोन दिवस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे. दंगल नियंत्रक पथकासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान हा पोल हटवण्यापूर्वी याला असलेले विद्युत कनेक्शन कट करण्यात आले. व त्यानंतर नगरपंचायत पथकाने हा पोल हटवला. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते महेश सावंत, सोनू सावंत, हरेश पाटील, हनुमंत बोंद्रे, नगरपंचायत कर्मचारी राजेश उंबळकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.