*मराठी बालभारती, लघुपट, थीम साँग आदींसाठी काव्यलेखन करणाऱ्या नंदुरबार येथील प्रसिद्ध लेखिका कवयित्री सौ सुनंदा भावसार यांची अप्रतिम काव्यरचना*
मला आवाज देणार्या समजलेल्या दिशा दाही
दिशा अकरा असू शकतात कोणाच्या मनालाही
वजाबाकी, गुणाकारात जो तो दंग झालेला…
अमूर्ताला अमूर्तानेच भागावे कळत नाही?
जिथे जातात सारेजण मलाही जायचे आहे…
नरक किंवा असू द्या स्वर्ग देता का कुणी ग्वाही?
शहाण्यांची जरी संख्या तिथे चिक्कार झालेली…
तिथे खात्री कुठे आहे ‘ इथे वेडा कुणी नाही..’.
उभे नाणे क्वचित पडते दखल त्याची किती घ्यावी?
नव्याने खेळण्यासाठी नवा कर छापकाटाही!
सौ.सुनंदा सुहास भावसार
दि.२१/०४/२०२२