मोठ्या प्रमाणात नुकसान; नागरीकांची घटनास्थळी गर्दी…
वेंगुर्ला
शहरात असलेल्या गुलजार कापड दुकानास भीषण आग लागुन मोठे नुकसान झाले. ही घटना आज रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मायबोली हॉटेल जवळ असलेल्या दुकानात घडली. अश्रफ मुजावर असे दुकान मालकाचे नाव आहे. यात मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. उशिरा पर्यत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.