You are currently viewing कणकवली कॉलेजच्या प्राध्यापकांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने राबविली अनोखी संकल्पना

कणकवली कॉलेजच्या प्राध्यापकांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने राबविली अनोखी संकल्पना

कणकवली :

 

कणकवली कॉलेजमध्ये मागील अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अनोखी संकल्पना राबवली. केवळ कागदावरची संकल्पना न राबवता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रा. फराकटे यांनी घेतली.

कणकवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या नगरपंचायतच्या ८१ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयाची अशी एकूण ८१ हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देत प्रा. फराकटे यांनी आपल्यातील दातृत्व दाखवून दिले.

नेहमीच सामाजिक उपक्रमात कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ही सामाजिक बांधिलकी जपली. या दातृत्वाच्या उपक्रमाची कुठेही प्रसिद्ध न करता अनिल फराकटे यांनी आपल्या सेवाभावी कामाचा प्रसिद्धीचा हव्यासही ठेवला नाही. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

मागील अनेक वर्ष कणकवली कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक अनिल फराकटे यांच्या हाताखाली कणकवलीतील अनेक पिढ्या शिकल्या व त्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. याबद्दल प्राध्यापक अनिल फराकटे यांचा कणकवली नगराध्यक्ष स्वामी नलावडे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ॲड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, नगरपंचायत ब्रँड अँबेसिडर व व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे आदी उपस्थित होते. प्राध्यापक अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत स्वच्छता कर्मकारांच्या अनोख्या पद्धतीने केलेला गौरव हा अनेकांसाठी आदर्श घेण्यासारखाच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा