*पालखीतील गोल रिंगणाचा विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही घेतला आनंद..*
तळेरे : प्रतिनिधी
आषाढी वारीला तब्बल ८०० वर्षाचा इतिहास आहे, आषाढी वारीत अनेक ठिकाणाहून विविध संतांच्या येणाऱ्या पालख्या हे एक खास वैशिष्ट्य असून,उभे रिंगण,गोल रिंगण तसेच शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी दिंडीत खेळले जाणारे विविध खेळ हे या वारीचे खास वैशिष्ट्य असते.
आपल्या भारतीय संस्कृतीचे परंपरेचे दर्शन विद्यार्थ्यांना व्हावे पालखी सोहळ्याची माहिती मिळावी यासाठी कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम! रामकृष्ण हरी!पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल !!!!श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय!! चा जयघोष करीत…. पंढरीच्या पांडुरंगालाच रुखमाईसह संताना घेऊन कासार्डेतील पालखी सोहळ्यात अवतरले…
यामध्येविठ्ठल- कु.अमोल दीपक जाधव,रूखमाई – कु. काव्यांजली सत्यवान देवरुखकर,तुकाराम -कु. ध्रूव अभिजित शेट्ये ,ज्ञानेश्वर -कु.कैवल्य अतुल मुंडले, मुक्ताई -कु. गायत्री जोशी व इ. 6वी तील पखवाज वादक -कु.अश्मेष अनुरूद्र लवेकर या विविध पात्रांबरोबरच छोटी वारकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन निघालेल्या छोट्या छोट्या इ.५वीतील विद्यार्थ्यीनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
आषाढी वारीचा, संतांच्या पालखीचा व पालखीतील रिंगण सोहळ्याचा आनंद कासार्डे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना याची देही! याची डोळा! प्रत्यक्ष अनुभवता आला. विद्यार्थ्यांबरोबरच विद्यालयातील शिक्षकांनीही रिंगण सोहळ्यातील विविध खेळांचा आनंद लुटला.
दरम्यान प्राचार्य श्री. एम.डी. खाड्ये यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे तसेच आपल्या रूढी परंपरा यांची ओळख व्हावी यासाठी असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनीही आपली संत परंपरा यामाध्यमातून समजून घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्याना शुभेच्छा देताना केले. याप्रसंगी पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.