कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार श्रीधर गोंधळी व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे उमेदवार अभिजीत गायकवाड यांच्यासह आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी इचलकरंजी येथील रिक्रेशन हाॅल येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मतदार सभासदांशी संवाद साधताना केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेमध्ये यापूर्वी सत्ताधिका-यांनी मनमानी कारभार करत सभासदांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांना या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देवून सेवा करण्याची संधी देण्याची गरज आहे. हीच योग्य भूमिका पटल्याने या निवडणुकीत राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भुलथापांना आता मतदार बळी पडणार नाहीत. याउलट प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार असलेल्या राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी वर्गातील उमेदवार श्रीधर गोंधळी व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे उमेदवार अभिजीत गायकवाड यांच्यासह आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवून पारदर्शी व विश्वासार्ह कारभार करण्याची संधी द्यावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवडणूक प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात सर्व मतदार सभासदांना केले आहे.
यावेळी माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष बालन पवार, उपाध्यक्ष कपिल पवार, सचिव अनिल कोळी, ज्येष्ठ सदस्य विठ्ठल यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व मतदार सभासद उपस्थित होते.