जिल्ह्यातील 1 मध्यम आणि 12 लघु प्रकल्प फुल
सिंधुदुर्गनगरी
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 70.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 344.079 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 76.91 टक्के भरले आहे. तसेच जिल्ह्यातील कोर्ले सातांडी हा मध्यम प्रकल्प आणि 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-49.8040, अरुणा -3.0900, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे-1.935, ओटाव-0.790, देंदोनवाडी – 0.748, तरंदळे -2.467, आडेली-0.984, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.593, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.912, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 0.856, दाभाचीवाडी- 1.250, पावशी- 3.030, शिरवल -2.842, पुळास -1.508, वाफोली – 1.425, कारिवडे – 0.861, धामापूर – 1.341, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.720, ओझरम – 1.819, पोईप – 0.791, शिरगाव – 0.288, तिथवली – 1.017, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-1.584, शिरवळ-0.461, वर्दे-0.000, कोकीसरे-0.301, नानीवडे- 0.395, सावडाव-0.292, जानवली-0.650 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.