सावंतवाडी :
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची “लोकसभा प्रवास योजनेची” बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी – राजवाडा येथे संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रभारी रणजित देसाई व विधानसभा संयोजक महेश सारंग उपस्थित होते . यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची कोअर कमीटी गठीत करण्यात आली .
*सावंतवाडी विधानसभा कोअर कमीटी*
—————————————-
*खासदार*- केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब .
*जिल्हाध्यक्ष*- राजन तेली .
*विधानसभा प्रभारी* – रणजित देसाई .
*विधानसभा संयोजक*- महेश सारंग .
*जि.प.अध्यक्ष ( माजी )*- सौ. रेक्ष्मा सावंत .
*जि.प.उपाध्यक्ष ( माजी )*- राजेंद्र म्हापसेकर .
*नगराध्यक्ष*—-
1) राजन गीरप – वेंगुर्ले .
2) सच्चीदानंद उर्फ संजु परब – सावंतवाडी .
3) चेतन चव्हाण – दोडामार्ग .
*सर्व मोर्चा चा विधानसभा क्षेत्रातील माहिती असलेला पदाधिकारी*– चंद्रकांत जाधव .
*विधानसभा क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती*—–
1) प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई .
2) मंदार कल्याणकर .
3) लखमराजे भोसले .
4) एकनाथ नाडकर्णी .
5) श्वेता कोरगांवकर .
यावेळी विधानसभा स्तरावरील नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक मंडल अध्यक्षांना आप आपल्या मंडलातील पदाधिकारी यांची नावे – सोशल मीडीया टीम, मीडीया टीम, कायदा (विधी), केंद्र सरकारच्या योजनांसाठीची समिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रत्येक मंडल अध्यक्षांकडुन बुथसक्षमीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वेंगुर्ले, बांदा, सावंतवाडी, आंबोली व दोडामार्ग मंडलातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी आणि आभार प्रदर्शन आंबोली मंडलाचे प्रभारी रविंद्र मडगांवकर यांनी केले.