कुडाळ
ग्रामीण उद्यानविद्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतीच्या अभ्यासासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत माणगांव ग्रामपंचायतमध्ये या विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी अनोखे असे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र उभारले आहे. या माहिती केंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला माणगांव गावचे सरपंच श्री. जोसेफ डांटस ,उपसरपंच दत्ताराम कोरगावकर प्रगतशील शेतकरी व उद्योजक श्री.जयंत कुबल , उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे प्राध्यापक डॉ.रणजीत देवारे सर, डॉ.गिरीश उईके सर , डॉ.पलसांडे सर माणगांव गाव चे कृषी सहाय्यक श्री.प्रशांत कुडतरकर आदी उपस्थिती होते. सर्व उपस्थित मान्यवर व शेतकरी यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि माहिती केंद्राच्या दालनाचे उदघाटन करण्यात आले. प्रस्ताविकामध्ये या दालनाच्या स्थापनेचा उद्देश विद्यार्थ्यांनी विशद केला. सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे प्राध्यापक डॉ.रणजीत देवारे यांनी ग्रामीण उद्यानविद्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा, उद्यानविद्या महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम या विषयाची माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी गावातील लोकांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी. कु.अमेय राजकुमार पाटील , कु.आदित्य रघुनाथ घालमे,कु प्रशांत प्रकाश जाधव , कु.शुभम शाम जाधव, कु.निखिल गणपत कांबळी, कु. ऋषभ शाकल्या या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.