You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा तृतीय वर्ष बी. एस्सी. आयटी चा निकाल १००%

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा तृतीय वर्ष बी. एस्सी. आयटी चा निकाल १००%

निदा बेग ८० % गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बी.एस .सी आयटी विभागाचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा एकूण निकाल १००% लागला.
एकूण १३विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये १२ विद्यार्थी ए प्लस ग्रेड व १ विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाला .एकूण निकाल १०० % लागला .
यामध्ये निदा बेग हिने ८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर राधिका घाटये व रेहान काजरेकर यांने ७९ % टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला . तर तृतीय क्रमांक वैष्णवी ब्रुड
हिने ७८ % गुण मिळवून पटकावला.
आयटी विभागप्रमुख प्रा. सौ . अक्षता गोडकर (सातार्डेकर ) , प्रा. स्नेहल नाईक , प्रा.सूरज सावंत प्रा. आदित्य वर्दम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले
संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले, संस्थेचे संचालक प्राध्यापक डी टी देसाई , अॅड . श्यामराव सावंत , डॉ. सतीश सावंत ,श्री जयप्रकाश सावंत तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल
यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ यावर्षीची बीएससी आयटीची मेरिट लिस्ट महाविद्यालयामध्ये लागलेली आहे . बारावी सायन्स व कॉमर्स मध्ये गणित विषय असलेले विद्यार्थी आयटीसाठी प्रवेश घेऊ शकतात .तसेच डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण केलेले विद्यार्थी दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतात .तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा