You are currently viewing भक्ती विठ्ठलाची

भक्ती विठ्ठलाची

लेखक कवी प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड, जिल्हा सांगली यांची अप्रतिम काव्यरचना

रम्य चंद्रभागा तीरी
विठू माऊली विसावे…
आषाढी नि कार्तिकीला
तिच्या भेटीसाठी जावे…

सख्या विठ्ठलाच्या दारी
सर्व संतांचा तो मेळा…
पुंडलिका च्या समोरी
रंगे कैवल्य सोहळा…

वारक-यांच्या सोबत
गातो तुकोबा अभंग…
त्याच्या अभंगाने येई
भजन किर्तनास रंग…

ज्ञानोबाही येत असे
तुकोबाच्या हो भेटीस…
‘हे विश्वची माझे घर’
सांगे समस्त जगास…

राष्ट्रसंत तुकडोजी
सांगे सोपी ग्रामगीता
मानवी कल्याणाची ती
थोर आचार संहिता…

‘संत डेबूजी’ ही करी
अंधश्रद्धा निर्मूलन…
त्याची पंढरीची वारी
स्वच्छतेचे अभियान…

विठू-दरबारी नाही
जाती धर्माला आधार…
ना सामाजिक राजकीय
सूड भावनेचा पदर…!

विठ्ठल तो रुजवावा
नित्यआपल्या हो मनी
जीवनी तो भजावा
स्मरुनी तो रात्रंदिनी…!!!

प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं.9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा