मालवण (मसुरे) :
गेली काही वर्षे ग्रामस्थांनी केलेल्या बंधाऱ्याच्या मागणीकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा फटका मसुरे कावावाडीच्या ग्रामस्थांना बसला आहेे. सलग ३ – ४ दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मसुरे गावच्या रमाई नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी आणि घरे यांच्यामध्ये सुमारे ३ ते ४ फुटाचे अंतर राहिले आहे. या प्रकारामुळे मसुरे कावावाडी येथील ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत वावरत आहेत.
मसुरे कावावाडी येथील साबाजी हडकर यांच्या घरानजिक बंधारा उभारणी व्हावी. यासाठी येथील ग्रामस्थांचा गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सर्व लोकप्रतिनिधी यांनी पहाणीही केली. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रशासनने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी व याठिकाणी बंधारा मंजूर करण्यात यावा अशी मागणी पंढरी मसुरकर यांनी केली आहे