You are currently viewing १० जुलै रोजी कनेडी गटशिक्षण संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन

१० जुलै रोजी कनेडी गटशिक्षण संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन

कणकवली :

 

कणकवली तालुक्यात रविवारी १० जुलैला कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असून त्यांच्या असते विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे. यावेळी अद्यावत अशा व्यायाम शाळेची उद्घाटनही होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता संस्थेच्या ज्ञानदीप सभागृहांमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष पी.डी. सावंत, संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत आणि गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे १९५३ मध्ये संस्था स्थापन झाल्यानंतर प्रथम शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. संस्थेच्या माध्यमातून लावलेले शैक्षणिक रोपटे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कनेडी गटशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरील इंग्रजी माध्यम तर माध्यमिक स्तरावर सेमी इंग्रजी माध्यम दहावीपर्यंत शिकवले जाते. तसेच अकरावी, बारावी विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि कला शाखा आहे. संस्थेच्या माध्यमातून अद्यावत असे आयटी सेंटर असून संस्थेच्या प्रांगणामध्ये भव्य मैदान आहे.

सर्व शैक्षणिक अत्याधुनिक साहित्य बरोबरच आता विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लागावी यासाठी संस्थेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून अद्यावत अशी व्यायाम शाळा मंजूर झाली. या व्यायामशाही उद्घाटन रविवारी खासदार श्री. राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संस्थेच्या शालय समितीचे सर्व पदाधिकारी, पालक आणि शिक्षणक्षेत्रात वावरनाऱ्या मान्यवरांनी संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाल उपस्थितीत राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा