सावंतवाडी
मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळे यांच्या बागायतीत चिरे खाणीतील माती वाहून आल्याने नुकसान झाले आहे.
मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळ यांची माड बागायत व सुपारीची बाग आहे .त्याचप्रमाणे मिरी लागवड व इतर आंतर पिके घेतली आहेत. या बागेच्या वरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात चिरे खाणींचा व्यवसाय चालतो.
गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टी झाल्याने या चीरे खाण मारण्यासाठी काढलेली माती पाण्याबरोबर वाहत येऊन सावळ यांच्या माड बागायती माती साचल्याने माड बागायती चे फार मोठे नुकसान झाले आहे.वारंवार महसूल विभागाकडे तक्रार करूनही या खाणींवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे मत सावळ यांनी व्यक्त करत महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे याची अवैध चिरे खाणी व्यवसाय सुरू आहेत यावर वेळीच या लक्ष द्यावा अशी मागणी गोविंद सावळ यांनी केली आहे.दरवर्षी पावसाळ्यात या खाणीची माती वाहून आपल्या माड बागायतीत साचत असल्याने मोठे नुकसान होत असून हातातोंडाशी आलेले पीक या चिरेखाणी मधील येणाऱ्या मातीमुळे हिरावले जात आहे असे सावळ यांनी सांगितले.