You are currently viewing आषाढी वारी

आषाढी वारी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.भारती वाघमारे यांची अप्रतिम अभंग रचना

माझा विठूराया/उभा विटेवरी/ करकटेवरी/ ठेवितसे//१//

आषाढी हि वारी/ पांडुरंग दारी /मुखामध्ये हरी /भक्त गण//२//

पालखी विठ्ठल/ वाजवती टाळी/ अष्टगंध भाळी/वारकरी //३/

हातीअसे विना/ मुखी पांडुरंग भजनात दंग/
विठ्ठलाच्या//४//

विठ्ठल पालखी/ फुलांनी सजली/ अभंगात भिजली /रंगा रंगी //५//

भाळी अष्टगंध/ गळ्यात टाळ/ तुळशीची माळ/ भक्तांचीयि//६//

रंगला सोहळा/ पंढरी नगरी/ घोषणाम हरी/ पांडुरंग //७//

सौ भारतीये वसंत वाघमारे
राहणार -मंचर
तालुका-आंबेगाव
जिल्हा -पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + sixteen =