कणकवली
कणकवली कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात नव्याने बसवल्यानंतर आज गुरुवारी सकाळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येण्यास सुरुवात झाली. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत मराठा समाज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नवीन पुतळा बसवल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलवले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, बापू खरात, किरण मेथे, रुपेश गुरव, उत्तम वंजारे, सचिन माने, मंगेश बावदने, सुप्रिया भागवत, आर के कुंभार यांच्यासह दंगल नियंत्रक पथक च्या दोन तुकड्यांसह पोलीस बंदोबस्त कार्यरत ठेवण्यात आला होता. त्यावेळी मराठा समाजाचे सोनू सावंत, सुशील सावंत महेंद्र सांबरेकर, उमेश घाडीगावकर, भाई परब, संदेश सावंत, सुशील दळवी, प्रदीप गावडे, बबलू सावंत, महेश सावंत, नाना सावंत, बच्चू प्रभूगावकर, आदी उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्यावर प्लास्टिक कागद घालून बांधण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी देखील कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मराठा समाज बांधवांना केले.