You are currently viewing कणकवलीत दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

कणकवलीत दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

कणकवली

तळेरेहून कणकवलीला दुचाकीने येत असताना उड्डाण पुलावर असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील अमरेश विठ्ठल तेंडोलकर (४५, कणकवली – कांबळेगल्ली) व विराज विजय चौकेकर (२९, चौके, मालवण) हे दोघे मृत्यूमुखी पडले. हा अपघात येथील एस हायस्कूलनजीक बुधवारी रात्री १२ वा. सुमारास घडला. अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलीस तसेच काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीवरील विराज यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अमरेश यांचा ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवताना मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. मयत अमरेश यांचे भाऊ जगदिश विठ्ठल तेंडोलकर (४९, कणकवली – कांबळेगल्ली) यांच्या फिर्यादीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा