You are currently viewing व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.एफ.सी. विभागामार्फत कृषी दिन साजरा..!

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.एफ.सी. विभागामार्फत कृषी दिन साजरा..!

बांदा

मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.एफ.सी.विभागामार्फत नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. एम.एस.एफ.सी.मधील शेती विभागातून कृषी दिना निमित्ताने सुपारी रोपांची लागवड करण्यात आली. या विभागात शेती विषयक सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी करत असतात. नर्सरी प्रशिक्षण, पशुसंवर्धन या संदर्भातील अभ्यासक्रम या विभागातुन आठवी ते दहावी मधील विद्यार्थी शिकत असतात. या विद्यार्थ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून सुपारी रोपांची लागवड केली. जवळपास २५ सूपारी रोपे लावण्यात आली. सुरुवातीस शाळेच्या उपमुख्याध्यापीका सौ.शिल्पा कोरगावकर यांनी वुक्ष लागवड करून कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्री.प्रायमरी प्रमुख हेलन राँड्रिक्स, विभागप्रमुख रिना मोरजकर, समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, निदेशिका सौ.रिया देसाई,सौ.गायत्री देसाई, तसेच इयत्ता दहावी मधील विद्यार्थी उपस्थित होते. यासाठी आत्मविश्वास नर्सरी चे जगदेव गवस यांचे सहकार्य लाभले

प्रतिक्रिया व्यक्त करा