You are currently viewing मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मळेवाड

मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघातील इयत्ता दहावी बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सुपारीचे रोप व पेढे देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे हे गेली मागील पाच वर्ष मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघातील दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण होऊन प्रशालेत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत आले आहेत.याहीवर्षी दहावी व बारावी प्रशालेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरी जाऊन सुपारीचे रोप व पेढे देऊन गोड कौतुक केले.या वेळी मुलांना शिक्षण घेत असताना किंवा प्रवेश घेत असताना कोणतीही अडचण आली तरी आपणाला संपर्क करा आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत विद्यार्थ्यांना करण्याचे आश्वासन मराठे यांनी विद्यार्थ्याना दिले.मराठे यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि केलेले अभिनंदन या बद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांमधून मराठे यांचे आभार मानण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत दांडेली सरपंच दादा पालेकर दादा गावडे,अमित प्रभू,गोपाळ मसुरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =