इचलकरंजी शहर परिसरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर होणार्या गायींची वाहतुक आणि कत्तली रोखण्याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशा मागणीचे निवेदन आज बुधवारी विश्व हिंदु परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आले.
हिंदु धर्मात धार्मीकदृष्ट्या गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे गो सेवा ही देखील अत्यंत पुजनीय आहे. गोरक्षणाकरता हिंदु कायमच कटाक्षपणे कार्यरत असतात. असे असले तरी महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशभरात प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गायी, बैल, वासरे यांची मोठी तस्करी होते. तसेच धर्मांध प्रवृत्ती गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात, असे दिसून येते. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गायींची दररोज विटंबना, तस्करी, कत्तल बेकायदेशीरपणे होण्याची शक्यता जास्त आहे. अशा घटनांमुळे समाजात जातीत तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोवंशाची वाहतूक आणि कत्तली रोखण्याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष्य देऊन संबंधीत दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज बुधवारी इचलकरंजी येथे विश्व हिंदु परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष बाळासाहेब ओझा, प्रविण सामंत, रणजित पवार, मुकुंदराज उरुणकर, प्रताप घोरपडे, अमित कुंभार, अनिल सातपुते, रावसाहेब चौगुले, सचिन वडर, अतुल तानापुरे ,महेश भिंगवडे, भिमराव कोकणे , गणेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.