सावंतवाडी
मळेवाड हेदुलवाडी येथील अनिता नाईक यांचे अतिवृष्टीत घर कोसळून 60 हजाराचे नुकसान झाले.
गेले आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठीक ठिकाणी ढगफुटी झाल्याप्रमाणे अतिवृष्टी झाली आहे.यावेळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मळेवाडी हेदुलवाडी येथील अनिता अनंत नाईक यांच्या मालकीच्या घराची भिंत व छप्पर कोसळून सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर यांनी केली.तसेच तलाठी गोरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.