You are currently viewing इचलकरंजीत प्रिंटर्स असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी

इचलकरंजीत प्रिंटर्स असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी

इचलकरंजी येथील प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीचे भान जपत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व फलक अनावरण असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.रोटरी मानव सेवा केंद्रातील या कार्यक्रमास प्रा.डाॅ.अमर कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इचलकरंजी परिसर मुद्रक संघ ही संघटना मुद्रण व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी लढतानाच व्यवसायातील नवे बदल स्विकारुन स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने कायम कार्यरत असते.याशिवाय वर्षभराच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.
या संघटनेच्या नावाचे नुकतेच नूतनीकरण करुन ते प्रिंटर्स असोसिएशन म्हणून शासनाकडून नोंदणीकृत करण्यात आले आहे.या नामफलकाचे अनावरण व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार , शैक्षणिक साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन रोटरी मानव सेवा केंद्रामध्ये करण्यात आले होते.प्रारंभी सामाजिक परिवर्तन चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा.डाॅ.अमर कांबळे यांच्या हस्ते प्रिंटर्स असोसिएशन नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यानंतर त्यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते मुद्रक व त्यांच्या कामगार बंधूंच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करुन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी असोसिएशनच्या वतीने प्रमुख पाहुणे प्रा‌.डाॅ.अमर कांबळे यांचा सत्कार अध्यक्ष महादेव साळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा‌.डाॅ.अमर कांबळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी दशेतच मोठे ध्येय उराशी बाळगून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नात सातत्य राखल्यास निश्चित यशाला गवसणी घालता येईल. यासाठी थोर महापुरुषांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिल्यास आपल्या हातून समाजहिताचे मोठे कार्य घडेल ,असा विश्वास बोलून दाखवला.यावेळी त्यांनी विविध दाखले देत करीयर निवड ते यशाचा टप्पा याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुद्रक संघाचे अध्यक्ष महादेव साळी यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेत भविष्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष सिताराम शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास सचिव संजय निकम , खजिनदार कलगोंडा पाटील , सदस्य विनोद मद्यापगोळ ,दीपक वस्ञे , नरेंद्र हरवंदे , गणेश वरुटे , राकेश रुग्गे ,सुधाकर बडवे ,दीपक फाटक , रणजीत पाटील सल्लागार दिनेश कुलकर्णी, शंकर हेरवाडे ,संतराम चौगुले ,संजय आगलावे , यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.आभार प्रदर्शन स्वप्निल नायकवडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा