7 व 8 जुलै रोजी ‘बळीराजासाठी एक दिवस’ उपक्रम
सिंधुदुर्गनगरी
विद्यार्थ्यांच्या मनात शेतकरी म्हणजेच बळीराजा विषयी आदर निर्माण व्हावा, शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचे महत्व कळावे, श्रमप्रतिष्ठा वाढावी, शेतीचे गणित, तंत्र, बी-बियाणे, खते, शेतीची अधुनिक अवजारे, किटकनाशके इत्यादीचा परिचय व्हावा, शेतीची प्रत्यक्ष अनूभुती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाच्या वर्षीही जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. 7 व 8 जुलै 2022 रोजी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी शाळेच्या संयोजनाने त्या त्या गावामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.
बळीराजासाठी एक दिवस या जिल्हास्तरीय उपक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 8 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषद शाळा गोळवण नं. 1, ता. मालवण येथे करण्यात आले आहे. तरी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनी श्री. धोत्रे यांनी केले आहे.