You are currently viewing 1 हजार 35 रुपयांचा हप्ता भरा आणि 51 हजार 760 रुपयांचे विमा संरक्षण मिळवा

1 हजार 35 रुपयांचा हप्ता भरा आणि 51 हजार 760 रुपयांचे विमा संरक्षण मिळवा

1 हजार 35 रुपयांचा हप्ता भरा आणि 51 हजार 760 रुपयांचे विमा संरक्षण मिळवा

31 जुलै 2022 रोजी पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये सहभागी व्हा

– जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी.एस.दिवेकर

सिंधुदुर्गनगरी

शासनाने खरीप हंगाम 2022-23 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर केली आहे. भात पिकासाठी 1 हजार 35 रुपयांचा प्रति हेक्टरी हप्ता असून प्रति हेक्टरी 51 हजार 760 रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर नागलीसाठी 400 रुपये प्रति हेक्टरी हप्ता असून 20 हजार रुपये प्रति हेक्टरी संरक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी दि. 31 जुलै 2022 रोजी पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी.एस.दिवेकर यांनी केले आहे.

            खरीप हंगाम 2021 मध्ये जिल्ह्यातील 2 हजार 873 पात्र बाधित शेतकऱ्यांना 90 लाख 9 हजार रुपयांची नुकसान भरपाई संबंधित विमा कंपनीकडून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या या योजनेची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

            योजनेचे उद्दीष्ट – नैसर्गिक आपत्ती, किड व रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळए पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेमध्ये वाढ करणे.

            योजनेची वैशिष्ट्ये – अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी योजना असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे. खातेदारांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के अशा मर्यादित ठेवण्यात आला आहे. भात व नागली या अधिसुचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न व विमा हप्ता दर खरीप व रब्बी हंगाम 2022-23 या कालावधीकरिता स्थिर असेल.

            जोखमीच्या बाबी – हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त होणारे नुकसान. पिकांच्या हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, मुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान. अधिसूचित पिकांचे काढणी / कापणीपश्चात (दोन आठवड्यांच्या कालावधीत) गारपीट, चक्रीवादळ, बिगर मोसमी पाऊस यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल.

            या योजनेमध्ये जिल्ह्यात भात व नागली या पिकांचा समावेश  असून अधिसूचित केलेल्या महसूल मंडळस्तरावर राबवण्यात येणार आहे.

            अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा