You are currently viewing देवगड तालुक्यातील मुणगे गावात कृषी दीन साजरा

देवगड तालुक्यातील मुणगे गावात कृषी दीन साजरा

देवगड :

 

देवगड तालुक्यातील मुणगे गावात विविध कृषी संस्थानी एकत्रितपणे वृक्षारोपण करत कृषी दिन साजरा केला. कृषी सहाय्यक श्रीम. व्ही. एस. तिरवडे, मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव, उपसरपंच धर्माजी आडकर, सदस्य सौ. अंजली सावंत उपस्थित होते. छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे कृषीदूत यांच्या संयुक्त विद्यमाने व ब्रिगेडियर सुधीरजी सावंत (संस्थापक: छ. शि. कृ. म. , किर्लोस) यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत झाडे लावण्यात आली. महाविद्यालयाचा कृषीदूतांनी झाडे लावण्याच्या पद्धतीबदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मातीची धूप रोखणे व जमिनीतील आद्रता मान्सून पश्चातही टिकून राहावी यासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे असे मार्गदर्शन केले. या वेळी कृषिदूत कु.ओमकार लाड, कु.आयुष खरात, कु.शुभम कुमावत, कु.अभय कुमार गायकवाड, कु.सौरभ सुवारे, कु.आकाश बगाटे, कु.समाधान चोपडे यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा