तर त्यांना चांगले खाते मिळण्यासाठी रामेश्वराकडे साकडे
वैभववाडी
भाजपाने शिंदे गटासह सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तळकोकणातील भाजपचे डॅशिंग आमदार नितेश राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागून त्यांना वजनदार खाते मिळावे व त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागावी यासाठी त्यांचे खंदे समर्थक वैभववाडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी रामेश्वर चरणी अभिषेक करून रामेश्वराला साकडे घातले