आठ दिवसात जागेच्या मंजुरीचे पत्र दाखविण्याचे श्री.जठार यांचे आव्हान….
अन्यथा, आंदोलनाचा इशारा…
कणकवली :
आडाळी आयुर्वेदिक संशोधन केंद्राच लातूरला स्थलांतरित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी माजगच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे.या प्रश्नावर सतत आवाज उठविणारे भजापा प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज पुन्हा शिवसेना पक्षाच्या नेत्यावर टीका केली आहे.आठ दिवसात जागेच्या मंजुरीचे पत्र सिधुदुर्गातील जनतेला दाखवा. नाहीतर सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या दोन आमदार व खासदाराच्या घरासमोर भाजपा घंटानाद आंदोलन करेल. प्रकल्पाला आडाळीत जागा मिळत नाही तो पर्यंत तुम्हाला थारा देणार नाही असा इशारा दिला आहे.
दोन जिल्हे शर्यतीत होते पण पत्रात जळगांव कसे योग्य नाही सिंधुदुर्गातच झाला पाहीजे हे भाजपाचे केंद्रीय मंत्री सांगताहेत तरी सुद्धा अचानक लातुर कुठून आले ? वैभव भाऊ ? यांचे उत्तर द्या असा सवाल आमदार वैभव नाईक यांना प्रमोद जठार यांनी केला.
लातुर सोडाच सिंधुदुर्गात केला नाहीत तर हा प्रकल्प महाराष्ट्रात कुठेही होउ देणार नाही. प्रकल्प केंद्राचा आहे. खासदार विनय राउत सांगताहेत त्याप्रमाने आठ दिवसात जागेच्या मंजुरीचे पत्र सिधुदुर्गातील जनतेला दाखवा. नाहीतर सिंधुदुर्गातील दोन आमदार व एका खासदाराच्या घरासमोर भाजपा घंटानाद आंदोलन करेल प्रकल्पाला आडाळीत जागा मिळत नाही तो पर्यंत तुम्हाला थारा नाही. असा इशारा माजी आम. प्रमोद जठार यांनी कळविले आहे.